Thursday, October 13, 2016

मोदी एक उमेद


    गेल्या महिन्या पासून पेपर वाचणे म्हणजे फार मोठे संकट वाटायला लागले आहे..काश्मीर वरील हल्ले , चीन ने आपली केलेली कोंडी ह्या सगळ्याचा राग..आणि ह्या परिस्थितीत संधी म्हणून उपयोग करून देशात चालू केलेलं राजकारण..म्हणजे तर देशाच्या प्रतिमेला फार मोठा तडा ..ज्या देशावर सत्ता असावी  ह्या उदेशाने तुम्ही हे सगळे राजकारण करत आहात त्याच देशाच्या  सीमा सुरक्षित नसतील, त्याच देशचा  भूगोलिक नकाशा काही क्रूर  बदलू पाहत असतील  तरी हि तुम्ही स्वार्थच पाहाल का???

      मोदी जी च्या विदेशी दौऱ्या वर टीका करने??त्यांना पाकिस्ताना मध्ये निवडणूक लढवा असे फालतू सल्ले देणे ..आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन मोदीवर टीका करणे ,ह्या पलीकडे काय नवीन ध्येय आहे तुमच्या कडे ???काय देणार तुम्ही देशाला सत्ता तुमच्या  हातात आल्यवर  सुद्धा ..??? भारत पाकिस्तान  प्रश्न तर नेहरून पासून अगदी मनमोहन सिंग पर्यंत कोणीच सोडवला नाही ..आणि मग आज जर तो प्रश्न मोदी सरकार सोडवण्य साठी पाऊले उचलत आहेत तर त्या काय वाईट आहे???..
      आज जगातील सगळ्यात जास्त देश पाकिस्तानला आतंकवाद्याला खत पाणी घालणारा देश ह्या आपल्या विचारलं सहमत झाला ते काय उगाच!!! नाही का हा मोदी त्या सर्व  देशान सोबत तयार केलेल्या मैत्री पूर्ण नात्याचा हा  परिणाम....अगदी चीन ला जाताना सुद्धा मध्ये व्हिहात्नाम राष्ट्र ला भेट देऊन मोदीनी आपले नाते बळकट केले आहे...हे प्रयन्त, हे यश का नाही येत आहे त्या विरोधकांच्या लक्षात ??
   ह्या गेल्या ६९ वर्षात किती तरी गमले आपण  ह्या भारत पाक प्रश्न मुळे,किती तरी नेतृत्व करणारे आले आणि गेले मग ह्या वेळेस विश्वास ठेऊन तर पहा नाही तरी दुसरा कुठला पर्याय पण तर समोर नहिये...आणि हे फालतूच राजकारण बंद करा आणि देशला ह्या प्रश्न तून बाहेर पडायला पर्याय सुचवा ,उगाच कुरघोड्या करणे हा उपाय नव्हे...
  
       

Friday, September 16, 2016

स्त्री पुरुष समानता : एक लढा




हा विषय निवडताना मला तो अगदी नेहमीचा सामाजिक विषय वाटला आणि तो मी सहजपणे मांडू शकेल ह्या उदेशाने निवडला.पण विषय तेव्हा अवघड होऊ लागला जेव्हा मी इतिहासचे दाखले आणि वर्तमानातील घडामोडी एकमेकांशी जुळवण्याचा प्रयत्न करू लागले आणि मग ठरवल ह्या विषयावर एक स्त्री म्हणून पाहता एक त्रयस्त व्यक्ती म्हणून विचार करायचं...
  स्त्री चूल आणि मुल हि परंपरा ओलांडून कधीच बाहेर पडली आहे...अगदी . १७०० च्या अहिल्याबाई, स्वराज्य व्हावे हि श्री ची इच्छा!!”हे स्वप्न छत्रपतींच्या विचारतून, आचारातून  पूर्ण करून घेणाऱ्या माता जिजाऊ सुद्धा हे सांगत होत्या .. ह्या स्त्रियांनी समाजातील रूढीन वर टीका करत बसने स्वीकारता लढा दिला तो एका उदांत हेतूसाठी,एका मोठ्या क्रांतीसाठी,समाजासाठी आणि आपण आज हि स्त्री पुरुष समानता, जी काम पुरूष करू शकतात ते स्त्रिया का नाही ह्या वाद मध्ये लढत आहोत...??? खरच सगळ्या ठिकाणी गरज आहे ह्या समानतेच्या लढाईची, एखाद्या मंदिरात जाऊन त्या मंदिरातील स्त्री ला येऊ देण्याची परंपरा मोडून  स्त्री पुरुष समानता होऊ शकते कानाही ..ह्या समानतेच्या लढाई मध्ये आपण मुळात हेच विसरून गेलो आहोत कि ईश्वराने ह्या जगात स्त्री आणि पुरुष ह्यांना वेगवेगळी गुण,शक्ती देऊन संपन्न केले आहे ते जगाच्या प्रगती साठी, आपसातील मोठे पण सिद्ध करण्या साठी नव्हे...
  मुळात स्त्री आणि पुरुष हि स्पर्धाच नाहीये, आपण ती तयार करत आहोत...स्त्रियांना वरील अन्याय ,अत्याचार खरच खूप खेदकारक बाब आहे..पण त्यासाठी प्रत्येक वेळी मोर्चे,आंदोलनेकरणे हाच उपाय आहे का? आणि त्यामुळे खरच पिडीत स्त्रियांचं जीवन सुखकर होत आहे का?...हा मोठा प्रश्न उभा राहत आहे...मूळ प्रश्नला बाजूला ठेऊन आपण सरळ समानतेच्या लढाईला लागतो...आणि हि समानता कधी स्पर्धा होऊ लागली हे कळलेच नाही, कारण आज मुलीला hot म्हणणाऱ्या मुलांप्रमाणे मुलांना handsome,cool अस म्हणाऱ्या मुली सुद्धा आहेत,इथेही स्पर्धा होतच आहे...तर काही ठिकाणी Party मध्ये दारू पिणे ह्या गोष्टीहि मुली अगदी मुलाच्या बरोबरी करत आहेत...स्त्रियांची प्रगती म्हणजे shots घालणे ,western culture follow करणे हीच आहे का?? ह्या सर्व गोष्टीसाठी लढत आहोत का आपण स्त्री पुरुष समानता लढाई??कोणत्याही सामाजिक प्रश्ना विरुद्धचा लढा देताना त्यातील हेतू कधीच देशातील संस्कृतीला बाधा आणणारा नसावा... आणि हि लढाई आहे ती समाजातील जाजक रूढीन विरुद्ध,स्त्रीयांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी,त्याच्यातील स्व:त्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी ...
     स्त्री सन्मान,त्याचे अधिकार ह्या गोष्टीसाठी लढा गरजेचा आहेच...चूल आणि मुल ह्या गोष्टी सांभाळून आपल वेगळ स्थान तयार करण्याची कसरत स्त्रीला घ्यावी लागते कारण तिच्या असलेल्या भावनिक,संवेदनशील,प्रेमळपणाची बरोबरी कोणीच करू शकत नाही...नवीन पिढीतील  मुलींवर सुद्धा अधिकार बरोबर जबाबदारी टाकली जाईल तेव्हाच सबळ स्त्रिया तयार होतील..  शिक्षण बाकी अधिकाराचा योग्य उपयोग तेव्हाच होईल ज्यावेळी त्यालाजोडून जबाबदारी मुलीन वर टाकली जाईल..कारण मिळालेल्या freedomचा योग्यवापर करून olympic गाजवणारी पी.व्ही .सिंधू  एक आहे पण त्याच freedom चा गैरवापर करून Latenight पार्टीमध्ये दारू पिणाऱ्या मुली खूप आहेत..आणि ह्यात जर आपण पुरुष पितात मग आम्ही का नाही??हि समानतेची लढाई करत असू तर खरच ह्या लढाईचा मार्ग योग्य वळणार जात आहे का ह्यात शंका निर्माण होऊ शकते...⁠⁠⁠⁠


-        प्राजक्ता क्षीरसागर