Thursday, October 13, 2016

मोदी एक उमेद


    गेल्या महिन्या पासून पेपर वाचणे म्हणजे फार मोठे संकट वाटायला लागले आहे..काश्मीर वरील हल्ले , चीन ने आपली केलेली कोंडी ह्या सगळ्याचा राग..आणि ह्या परिस्थितीत संधी म्हणून उपयोग करून देशात चालू केलेलं राजकारण..म्हणजे तर देशाच्या प्रतिमेला फार मोठा तडा ..ज्या देशावर सत्ता असावी  ह्या उदेशाने तुम्ही हे सगळे राजकारण करत आहात त्याच देशाच्या  सीमा सुरक्षित नसतील, त्याच देशचा  भूगोलिक नकाशा काही क्रूर  बदलू पाहत असतील  तरी हि तुम्ही स्वार्थच पाहाल का???

      मोदी जी च्या विदेशी दौऱ्या वर टीका करने??त्यांना पाकिस्ताना मध्ये निवडणूक लढवा असे फालतू सल्ले देणे ..आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन मोदीवर टीका करणे ,ह्या पलीकडे काय नवीन ध्येय आहे तुमच्या कडे ???काय देणार तुम्ही देशाला सत्ता तुमच्या  हातात आल्यवर  सुद्धा ..??? भारत पाकिस्तान  प्रश्न तर नेहरून पासून अगदी मनमोहन सिंग पर्यंत कोणीच सोडवला नाही ..आणि मग आज जर तो प्रश्न मोदी सरकार सोडवण्य साठी पाऊले उचलत आहेत तर त्या काय वाईट आहे???..
      आज जगातील सगळ्यात जास्त देश पाकिस्तानला आतंकवाद्याला खत पाणी घालणारा देश ह्या आपल्या विचारलं सहमत झाला ते काय उगाच!!! नाही का हा मोदी त्या सर्व  देशान सोबत तयार केलेल्या मैत्री पूर्ण नात्याचा हा  परिणाम....अगदी चीन ला जाताना सुद्धा मध्ये व्हिहात्नाम राष्ट्र ला भेट देऊन मोदीनी आपले नाते बळकट केले आहे...हे प्रयन्त, हे यश का नाही येत आहे त्या विरोधकांच्या लक्षात ??
   ह्या गेल्या ६९ वर्षात किती तरी गमले आपण  ह्या भारत पाक प्रश्न मुळे,किती तरी नेतृत्व करणारे आले आणि गेले मग ह्या वेळेस विश्वास ठेऊन तर पहा नाही तरी दुसरा कुठला पर्याय पण तर समोर नहिये...आणि हे फालतूच राजकारण बंद करा आणि देशला ह्या प्रश्न तून बाहेर पडायला पर्याय सुचवा ,उगाच कुरघोड्या करणे हा उपाय नव्हे...