Wednesday, February 22, 2017

पाहायचे आहे मला....

पाहायचे आहे मला
ते दुसरे जग
सोनेरी प्रकाशाने उजळून निघालेले
असे लोकांच्या तोंडूनच ऐकलेले
चुकून स्वप्नात ओझरतेच  पाहिलेले
प्रत्यक्षात कधी न पाहिलेले
ते जग जवळून पाहायचे आहे मला

सोनेरी सिंहासनावर बसलेल्या
कुबेराच्या सहवासात
अनुभवायचे आहे मला
कधी तरी
ते दुसरे जग
कसे असते
ते सोनेरी जग
अनुभवायचे आहे मला
पाहायचे आहे मला
ते दुसरे जग........