Friday, July 29, 2016

Dear cancer …..

Dear cancer …..
                      हो ...तुला प्रिय म्हणण्यशिवाय माझ्या कडे दुसरा पर्यायच ठेवलाच नाहीये तू.....कारण तुझा खूप तिरस्कार करून झाला ...देवा कडे तुझ्या विरुद्ध साखडकरून झाल पण काहीच उपयोग झाला नाही... तुझ्या विरुद्ध च्या लढाई मध्ये शेवटी आम्ही सपशेल हरलोच आहोतच ..  आज तुला हे पत्र लिहिण्य्च कारण एकच कि जस  ,युद्ध संपल्या नंतर जेव्हा हरलेल्या पक्षातील एखादा सभासद आपल्या राज्याच्या वतीने जिंकलेल्या राजा कडे जाऊन आपल्या राज्याला ह्या युद्धमुळे सोसाव्या लागेल्या यातनांची, दु:खाची बेरीज वजाबाकी करण्याचा पर्यंत करतो,तोच  आज मी करणार आहे....तू येण्याने आलेले अकाली वादळ ,एक छोटास सुखी घरट उध्वस्तकरून गेल...रचलेले सगळे मनोरे एक क्षणात भंगले या वादळमुळे...
                        माझी आई ..एका संस्कारी स्वाभिमानी घरतील लेक,जेव्हा  आमच्या घरात आली तेव्हा पासून आपल्या कष्टानी,,मायेनी ,,प्रेमाने त्या माउली ने सारा संसाराचा राहाट गाडा ओडत नेला..आणि त्याच घरच्या कर्त्या स्त्रीला तू आपल्या विल्ख्य्त घेतलस...तू ज्या क्षणी आमच्या आयुष्यात आला त्या वेळी  पाया खालची  जमीन हलन.. न डोक्यावरच छप्पर उडण ह्या शब्दचा  खऱ्या जीवनातील अर्थ कळला..रोज सोबत असणारी पाउल वाट हरवत चाली होती...आई एक एक दिवस माझ्या पासून  दूर चालली होती...जगातलं सर्वांत मोठ दु:ख मरण मुळीच नाहीये ,तर आपल्याच  माणसाच्या मरणाची वाट पाहणे आहे  हे, त्या वेळी मला समजल...होय!!!!! त्या माउलीच्या मरणाची वाट पाहायला लावलीस तू आम्हाला  ...तू फार मोठ पाप करून घेतलास कि रे आमच्या कडून...तुझे आघातच एवढे ताकदीचे होते कि आम्हाला तर तू निभाव लागणे फार कठीण होते. ..वेदने मध्ये जीवाचा आकांत करत “मला ह्या वेदना मधून मुक्त करा” अस सांगणारी माझी आई ..आणि तुझ्या विरुद्ध लढण्यासाठी  काही तरी  शास्त्र  व शस्त्र उपयोगी पडतंय का???हे पाहत प्रत्येक हॉस्पिटलच्या  पायऱ्या आणि देवळातील उंबरटे झिजवणारे आम्ही ....आणि शेवटी वादळ शांत झाल ..लढाई संपली.. तू जिंकलास ..आणि हे वादळ  आपल्या  सोबत  अगदी अधाश्या सारख घेऊन गेल ते आमच्या आयुष्यातील ...विश्वास ..समाधान आणि ... प्रेम.
                         राजा युद्धात जेव्हा गतप्राण होतो तेव्हा त्याच्या मागे राहिलेलं  त्याच सैन सैरभैर होत .विचलित होत..लढण्याचा ..स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा कवडी मोल पर्यंत हि करत...पण काहीच वेळात त्यानं  समजत कि आपल अस्तित्वच  त्या राज्याच्या असण्यावर अवलंबुन होते..आता तोच नाही तर कसली आली आहे  हि लढाई अस्तित्वाची ...आणि संपल असत त्या वेळी सगळ...सगळ निशांत ...निश्ब्द्त ...त्या प्रकारे झाली आहे आमची अवस्था...तिच्या शिवाय  जगण्याचा अस्तित्व टिकवण्याचा  पर्यंत आम्ही पण त्या युद्धातील सैन्य सारखा  करत आहोत पण तिच्या नंतर काही अस्तित्वच उरल नाही हे  जाणवत आहे... वादळ शांत झाल्या नंतर कळतंय ,कि काय काय गमावलं आहे ह्या वादळात..कारण सोसताना वेग एवढा होत कि काय काय निसट आहे हे कळालाच नाही...
                             आई चा विश्वास गमावला होता ..कारण “ मला ह्यावेदने मधून माझी माणसे नक्की बाहेर काढतील” हा ठाम विश्वास तिच्या मना मध्ये होता, जगण्याची पूर्ण अशा तिच्या मना मध्ये होती...पण तू एवढ तडफडत मारलस तिला कि तिचा सगळा विश्वास गमला आम्ही. समाधान गमावलं, आई हे दैवत आयुष्यात एवढ्या मोठ्या स्थानावर असतना कि त्याला आनंद देणे हेच मुळी आयुष्यातील सर्वात मोठ ध्येय असत आणि पण कम नशिबी आहे आम्ही आयुष्यातील सर्वात मोठ ध्येय भंगले, ध्येया विना आयुष्यात राहत ते फक्त असमाधान ..प्रेम ह्या वर काहीच बोलणे नको..आई म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा  अथांग सागर..आणि मी एवढी कम नशिबी कि माझ तोच सागर अगदी उमिदिच्या वयात आटला...
                         वादळ तर शांत झाल आहे पण भविष्यच एक भयाण चित्र निर्माण करून .....तू घरातील घरपण नाहीस केलास ... जगातील सर्वात मोठ पाप म्हणजे माणसा मधील आशा संपवणे आणि तू ते केलस... निराशा पसरवली आमच्या आयुष्यात, डोळ्याच्या पापण्यत भविष्याच्या स्वप्ना एवेजी दुखाचे काळे ढग दाटले आहेत..आणि डोळ्यातील पाणी पावसासारखे  कितीही वाहून गेले तरी ग्रीष्माची तलख  काहीच कमी होत नाहीये.  ..आई जवळ असणार आमच बालपण तू आमच्या पासून हिरावून घेतलस..आणि लोकां कडून मिळणारी  सहानभुती म्हणजे तर “आपल दुख क्षण भरहि न विसरण्याचा शाप”, तुझ्या मुळे आम्हाला मिळाला..
                        शेवटी एकच सागणे ,अशी खूप गोड घरटे उध्वस्त केली आहेस, करतो आहेस आणि करशील आणि तुझ्या पराक्रमाच्या इतिहास तू ते रचशील..पण हे करताना एकदा ह्या त्रासला तू स्वतः हि सोसून पहा तुझ्यामुळे होणारी तडफड, मरण यातना ,,हे एकदा तरी भोगून पहा...मग तुला कळेल किती क्रूर पणे  इतिहास ..वर्तमान..आणि भविष्य निर्माण केलस तू ..आमच्या समोर......

4 comments:

  1. ह्रदयस्पर्शी पत्र

    ReplyDelete
  2. ह्या आयुष्यातलं हे एकमेव दुःख..मनातलं बोललीस..

    ReplyDelete