अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवडे तोडून बाहेर उडू पाहतोय ........
आपल्याच घरच्या भिंती कधी
आपलीच साथ देईनाश्या होतात ,
काळोखात चाचपडत जीव तेव्हा
क्षणा क्षणाला आत गुदमरत राहतो..........
पड्यादअडून मग कधीतरी दिसतो
एक किरण नव्या आशेचा
आणि मग नकळतच
विश्वासाचा एक धागा
अवचित जुळून येतो भाग्याचा .....
त्या अंधाऱ्या खोलीत
एक काजवा चमकू पाहतो
विशाल सूर्याच्या प्रकाशात
नव स्वप्नाचे मनोरे रचू लागतो. .....
अचानक त्या किरण सोबत
धुळीचा लोट वाहू लागतो,
मानाच्या गाभाऱ्यातण सांगता
एक कला ढग गर्दी करू पाहतो
जीव गुदमरतो ,आकांत करतो
पुन्हा एड होऊन एकाकी
त्या काळोखात तो चाचपडत राहतो .......
पुन्हा नवा किरण शोधण्यासाठी
प्रदूषणातही नव्याने जगू पाहतो
काळ लोटला जातो तसे
असे अनेक अनाहूत काळे ढग
आसपास –आतबाहेर चोहीकडे
पसारा करून जमत असतात ...........
जीव आत पुरता अडकून जातो
गुदमरत राहतो ,घुसमट राहतो
आसवाच्या पावसात भिजत राहतो
पण तरी पुन्हा एकदा
अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवाडे तोडून
बाहेर उडू पाहतोय............
No comments:
Post a Comment